आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Member Of Parliament's Brother Beat Local Man To Death

BJPखासदाराच्या भावाचा प्रताप, शिक्षण संस्था चालकाला घरातून खेचून मारले, अंगावर घातली गाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार रणविजय सिंह जूदेव यांचा भाऊ विक्रमादित्य सिंह जूदेव यांनी सोमवारी एका खासगी शाळेच्या संचालकाला बेशुद्ध होई पर्यंत बेदम चोपले आणि त्यानंतर त्याच्या अंगावर पजेरो गाडी घातली. संस्था चालकाला गंभीर अवस्थेत झारखंडमधील रांची येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टारांनी सांगितले, की त्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे.
काय आहे प्रकरण
परमेश्वर गुप्ता यांची जशपूर येथे एका खासगी शाळा आहे. विक्रमादित्य सिंह जूदेव उर्फ बाबा आणि गुप्ता यांच्यात बर्‍याच दिवसांपासून जमीनीचा वाद आहे. जूदेव यांचा दावा आहे, की ज्या भूखंडावर शाळा उभी राहीली आहे, ती त्यांच्या मालकीची आहे. हा भूखंड रिकामा करण्यासाठी ते अनेक दिवसांपासून गुप्ता यांच्यावर दबाव टाकत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सोमवारी सकाळी 11 वाजता विक्रमादित्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी परमेश्वर गुप्ता यांच्या घरी पोहोचले. त्यांना घरातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण करु लागले. जेव्हा गुप्ता बेशुद्ध पडले तेव्हा विक्रमादित्य याने त्यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढवली.'
जुदेवच्या अटकेची मागणी
जुदेव याला अटक करण्यात यावी यासाठी लोकांनी कलेक्टरला घेराव घातला. जुदेव जशपूरच्या राजघराण्याशी संबंधीत आहे. विक्रमादित्य जुदेव याने आज केलेल्या मारहाणीनंतर लोकांनी राज महलासमोर आंदोलन सुरु केले आहे. येथील काही वयोवृद्ध लोकांचे म्हणणे आहे, की राजमहलासमोर आंदोलन होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पाहा घटनेशी संबंधीत छायाचित्रे