श्रीनगर- द्रासमध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्मारक उभारण्यात आले आहे. शनिवारी येथे शहिदांचे नातलग, लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण केली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेतले होते.
भारतीय भूमीवरून घुसखोरांना हुसकावून लावण्यात भारतीय लष्कराला यश आले. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. शहीद जवानांच्या स्मरणार्थ रविवारी लष्कराने येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात शहिदांच्या पत्नींना निमंत्रित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज...