आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी झोपले की रात्री गुपचूप करायचा खोदकाम, 50 फूट खोल खोदण्याचे हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मांत्रिकाच्या नादी लागून या तरुणाने आपल्याच घरात तब्बल 50 फूट खोल खोदकाम केले. - Divya Marathi
मांत्रिकाच्या नादी लागून या तरुणाने आपल्याच घरात तब्बल 50 फूट खोल खोदकाम केले.
हमीरपूर - यूपीच्या हमीरपूरमध्ये गुप्तधनाच्या लालसेने एका व्यक्तीने आपल्या घरात तब्बल 50 फूट खोल खड्डा खोदून काढला. 6 महिन्यांपासून ज्या खड्ड्याचे तो खोदकाम करत होता, रविवारी त्यातच फसून बसला. पोलिसांनी 4 तास अथक परिश्रम घेऊन 50 फूट खोल खड्ड्यातून या फसलेल्या तरुणाला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.
 
असे आहे प्रकरण...
- संदीप साहू (40) हा सुभाष बाजार येथे राहतो. 4 भावांत सर्वात मोठा आहे. 6 महिन्यांपूर्वी त्याच्या घरी एक मांत्रिक आला होता. त्याने घराच्या प्रवेशद्वारापासून आत अंदाजे 10 फूट लांब अंतरावर जमिनीत मोठे धन असल्याचे त्याला सांगितले. गुप्तधनाची माहिती ऐकून तरुण चकित झाला. 
- मग काय, मांत्रिकाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तो रोज रात्री शेजारी झोपल्यावर खोदकाम करू लागला. तथापि, त्याच्या भावांनी त्याला असे करू नकोस म्हणून  बजावले होते, पण नशेबाज संदीपने ऐकले नाही. या कामात त्याची आई लक्ष्मीही त्याची मदत करत होती. 6 महिन्यांपासून सातत्याने खोदकाम करून त्याने घरात तब्बल 50 फूट खोल खोदकाम केले.
- शनिवारी रात्रीही त्याने खोदकाम सुरू ठेवले, परंतु रविवारी सकाळी जेव्हा तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा फसून बसला. अग्निशमन विभागाने 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून त्याला अखेर बाहेर काढले.
 
खड्ड्यातून बाहेर येताच रडायला लागला संदीप...
- शेजारी म्हणाले की, खजान्यासाठी 6 महिन्यांपासून तो खोदकाम करत होता. यासाठी 20 फूट लांब शिडीही वापरायचा. 
- संदीपचे भाऊ गुड्डन आणि मनोज म्हणाले की, आम्ही त्याला कित्येकदा थांबवले, समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. भोंदूबाबाच्या नादी लागून असा अडकला.
- अथक प्रयत्नांनी जेव्हा संदीपला बाहेर काढण्यात आले तेव्हा संदीप ढसढसा रडायला लागला. तो तेव्हाही नशेमध्येच असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...