आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercy Home Owner Sexually Harassing Minor Girls In Jaipur

जयपूरमधील बालगृहात मुलीना विवस्त्र करून अमानवी कृत्य करत होता संचालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वैद्यकीय तपासणीसाठी मुलांना रुग्णालयात घेऊन जाताना पोलिस)

जयपूर- 'बालदिना'च्या पूर्वसंध्येला शहरातील एका बालगृहाच्या संचालकाचे 'कृष्णकृत्य' उघड झाले आहे. बालगृहातील मुलींना विवस्त्र करून त्यांचे लैं‍गिक शोषण करण्याच्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नराधम संचालक जॉन्सन चाको आणि त्याच्या पत्नीला अटक केले आहे.

राज्य प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून सामाजिक न्याय मंत्री अरुण चतुर्वेदी गुरुवारी बालगृहाची पाहाणी केली. पोलिस अधिकार्‍यांकडून घटनेचाआधावा घेतला. तसेच गांधी नगर बालिका गृहात जाऊन पीडित मुलींची विचारपूस केली. पीडित मुली 6 ते 15 वर्ष वयोगटातील आहेत. याप्रकरणी आज (शुक्रवारी) सचिव स्तरावर बैठक होणार आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व बालगृहे तसेच वृद्धाश्रमांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारींना निर्देश दिले आहेत.
बालगृहाचा संचालक जॉन्सन चाको हा मुलींचे लैंगिक शोषण करायचा. मुलींना बेदम मारहाणही करायचा. आरोपी चाकोच्या छळाला कंटाळून दोन पीडित मुलींना विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. मुख्याध्यापकांनी झोटवाडा पोलिसांमध्ये संचालक जॉन्सन चाको याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चाको आणि त्याच्या पत्नीला अटक केले.

जॉन्सन चाको केरळमधील रहिवासी असून मागील दहा वर्षांपासून जयपूर शहरात राहत आहे. त्याची पत्नी झोटवाडा बालगृह चालवते. विशेष म्हणजे आरोपीची मुले विदेशात शिक्षण घेत आहेत.

पी‍डित मुलींनी पोलिसांना सांगितले की, आरोपी जॉन्सन चाको हा त्यांना दोन-दोन दिवस जेवण देत नव्हता. कपडे काढायला सांगायचा. त्याला विरोध केल्यास लोखंडी सळईने तसेच काठीने मारायचा. जेवणात फक्त एक चपाती, थोडा भात आणि मीठ देत होता. तसेच चाको याची पत्नी आणि मुले देखील मुलींना हीन दर्जाची वागणूक देत होते.

असा झाला भांडाफोड...
बाल गृहातील सर्व मुली कल्याणकुंजमधील राजकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षण घेतात. राजकीय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, 'मिड-डे मील'मध्ये बालगृहातील पीडित मुली जेवणावर तुटून पडायला. त्या अशा जेवण करायच्या की, त्यांना अनेक दिवसांपासून जेवण मिळालेले नाही. मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलींना याबाबत विचारण केली असता, एका पीडित मुलीने मुख्याध्यापकांना आपबिती सांगितली. त्यानंतर त्यांना झोटवाडा पोलिसांत जॉन्सन चाको याच्या विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर सर्व 19 मुलींना गांधी नगर बालिका गृहात रवानगी करण्यात आली आहे.

धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती?
संचालक जॉन्सन चाको आणि पत्नी हे दोघे बालगृहातील एका खोलीत सर्व मुलींकडून एक प्रार्थना करवून घेत होते. सर्व मुली हिंदू समाजातील आहेत. यामुळे जॉन्सन चाको हा मुलींना धर्म बदलसाठी तर प्रवृत्त करत नव्हता ना, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटो...