आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Death Anv : भारतातही चालली होती जॅक्सनची जादू, भेटला होता बाळासाहेबांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किंग ऑफ पॉप म्हणून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या मायकल जॅक्सनची आज 5 वी पुण्यतिथी आहे. संपूर्ण जगभराप्रमाणेच भारतातही मायकल जॅक्सनच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुमारे 18 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या आमंत्रणावरून मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. त्यावेळी प्रभू देवा, अनुपम खेर यांसारख्या अनेक मोठ्या ता-यांनीही मायकलला भेटण्यासाठी गर्दी केली होती. तर सोनाली बेंद्रे हिने खास मराठमोठ्या वेशभुषेत मायकलचे विमानतळावर स्वागत केले होते.

मुंबईत पोहोचल्यानंतर मायकल जॅक्सन सर्वप्रथम शिवसेनाप्रुमुख बाळासाहेब यांची भेट घेण्यासाठी त्याच्या निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचला होता. तेव्हा बाळासाहेबांनी मायकलला भेट म्हणून चांदीचा तबला आणि तानपुरा दिला होता.
मायकल भारतात आला तेव्हा मुंबईत रस्त्यावर दुतर्फा त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अक्षरशः त्याच्या कारला जायलाही जागा मिळत नव्हती. त्यावेळी मायकल सुरक्षारक्षकांचे कवच तोडून चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता.

तीन विमानांतून आणले होते, शोचे साहित्य
मायकल जॅक्सनचा शो मुंबईच्या अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये झाला होता. या शोसाठी त्याने तीन रशियन विमानांमधून साहित्य आणले होते. त्याचा ताफा एवढा मोठा की त्यासाठी सुमारे 20 गाड्यांची गरज भासली होती.


मसाला डोशाचा आस्वाद
मुंबई प्रवासादरम्यान जॅक्सनने दक्षिण भारतीय आणि मुघलई पदार्थांचा आस्वाद घेतला होता. त्याने नाश्त्यात मसाला डोसा आणि लोण्याबरोबर आलूचे पराठे खाल्ले होते, असे सांगितले जाते. तर भोजनामध्ये तो नान, बटर चिकन, तंदूरी चिकन आणि मसालेदार भाज्या पसंत करत होता.
फोटो - मायकल जॅक्सनने मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.
पुढील स्लाईड्सवर पाहा मायकलच्या भारत दौ-याचे काही PICS