आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटी 38 लाखांचे पॅकेज मिळणारी मुलगी का म्हणाली- नाव आणि चेहरा दाखवू नका!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थिनीला तिची ओळख सार्वजनिक करायची नाहीये. - Divya Marathi
विद्यार्थिनीला तिची ओळख सार्वजनिक करायची नाहीये.

वाराणसी - बीएचयू आयआयटीमध्ये मॅथ्स अँड कॉम्प्युटर सायन्स (फायनल इयर) च्या विद्यार्थिनीला मायक्रोसॉफ्टने यूएससाठी 1 कोटी 38 लाख रुपये पॅकेजच्या जॉबची ऑफर दिली आहे. नाव आणि चेहरा न दाखवण्याच्या अटीवर विद्यार्थिनी म्हणाली, \"मी सॉफ्टवेअरमध्ये अॅप्लिकेशन ऑफ इंटेलिजन्सच्या जगात काम करू इच्छिते. मला पुढे भारतात काम करायलाही कोणतीही अडचण नाही.\"

 

सिस्टिम डिझाइन आणि टेक्निकल प्रश्न विचारण्यात आले
- विद्यार्थिनी म्हणाली, \"बीएचयू आयआयटीच्या प्लेसमेंट सेलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या हायर लेव्हल एक्स्पर्टसनी इंटरव्ह्यू घेतला. वेगवेगळे राउंड होते. सिस्टिम डिझाइन आणि टेक्निकल प्रश्न विचारण्यात आले.\"
- माझे स्पर्धक स्ट्राँग आणि हुशार होते. इंटरव्ह्यूमध्ये माझा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड होता. माझा अॅप्रोच आणि थॉट प्रोसेस समोरच्यांना चांगला वाटला.
- विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, आयआयटीचे करिकुलम सोपे असते, मेहनत मात्र चांगली घेतलेली असावी.
- शिक्षणात सर्वात जास्त मदत माझ्या भावाने केली, तो खूप खुश होता. माझ्या भावाने मला खूप मोटिव्हेट केले. मला अभ्यासण्यासाठी इंटरव्ह्यू एक्स्पीरियन्सशी निगडित लिंक्स देत होता.

 

का म्हणाली- नाव आणि फोटो जाहीर करू नका?
- विद्यार्थिनी म्हणाली, मला माझी आयडेंटिटी जाहीर करायची नाहीये. माझे पॅकेज यूएस डॉलरमध्ये आहे. ते अमेरिकेतल्या मानाने अॅव्हरेज पॅकेज आहे. त्याला इंडियन करन्सीत कन्व्हर्ट करून पाहिले जाऊ शकत नाही.

 

250 मुला-मुलींनी दिला होता इंटरव्ह्यू
- बीएचयू आयआयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे इंचार्ज प्रो. अनिल कुमार अग्रवाल म्हणाले, 250 मुला-मुलींनी इंटरव्ह्यू दिला आणि अनेकांचे सिलेक्शनही झाले.
- एका विद्यार्थिनीचे पॅकेज 1 कोटी 38 लाख रुपये आहे. तिला मायक्रोसॉफ्ट कंपनीने यूएससाठी निवडले आहे.
- ते म्हणाले की, 2014-15 मध्ये एका विद्यार्थिनीने गुगलला 2.3 कोटी, 2015-16 मध्ये 2.27 कोटी, 2016-17 मध्ये 1.20 कोटींचे पॅकेज देण्यात आले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...