आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mid Day Meal Issue In Bihar, School Head Master Meena Devi Arretted Today

बिहार मध्यान्ह भोजन प्रकरण: शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छापरा- छापरा जिल्ह्याच्या गंडामन येथील धर्मासती शाळेच्या फरार मुख्याध्यापिका मीना देवी यांना पोलिसांनी आज (बुधवार) दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली. या प्राथमिक शाळेत गेल्या 16 जुलै रोजी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली होती. त्यात 23 मुलांच्या मृत्यू प्रकरणी घटना घडल्यापासून शाळेच्या मुख्याध्यापिका देवी फरार होत्या. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले होते. मीना देवी या कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून धडपड करत होत्या. परंतु त्या आधीच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ती म्हणजे, मीना देवी यांचा पती या शाळेला अन्न-धान्याचा कच्चा माल पुरवत होते. सध्या त्यांच्या मालावर बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी कॉँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने शिक्षणमंत्री पी.के.साही यांच्या घरासमोर निदर्शने केली. आंदोलकांनी नेम प्लेट फेकून दिली होते. पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलेले 24 विद्यार्थी व स्वयंपाकीण मंजूदेवी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना आणखी दोन-तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू आहे.