आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Middle Class Save 40 Percent, Inflation Rate High

मध्यमवर्गाच्या बचतीला 40 टक्‍के फाटा!, महागाईचा भडका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात महानगरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना महागाईने चांगलेच ग्रासले आहे. त्यांची बचत गेल्या 3 वर्षांत 40 टक्क्यांनी कमी झाली. भाज्यांपासून शिक्षण, आरोग्य, इंधन आणि निवासी भाडे इतक्या वेगाने महागले की बिचा-या मध्यमवर्गीयांची बचत निम्म्यावरच आली.
‘असोचेम’च्या अहवालाचा हा निष्कर्ष आहे. वाढत्या महागाईचा अधिक उत्पन्न असलेल्या गटांवर मात्र परिणाम नाही. सर्वेक्षणात सहभागी 82 टक्के लोकांच्या मते महागाईमुळे त्यांचे जीवनमान 25 टक्के घसरले. देशातील गरीब जनता जीवनावश्यक व दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीशी जुळवून घेण्यात सक्षम नाहीत.
असे आहेत निष्कर्ष 82%
लोकांनी सांगितले की, गेल्या वर्षी वाढलेले वेतन दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी पुरेसे नाही.
70% लोक म्हणाले, विम्याचे हप्ते भरण्यापुरते पैसे वाचवणेही शक्य नाही.
60% लोकांच्या मते, उत्पन्नातील 15 हजार अन्नधान्य, आरोग्य आणि शिक्षणावरच खर्च होतात.
85% लोकांनी मूलभूत गरजांपैकी इंधन, होमलोन, शिक्षण, मुलांच्या भविष्याची तरतूद यालाच प्राधान्य दिले आहे.
वाढत्या महागाईमुळे खरेदी कमी झाल्याने विक्री घटली आहे.
याचा नकारात्मक परिणाम देशाच्या विकासदरावर पडू शकतो.
डी. एस. रावत, सरचिटणीस, असोचेम