आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Midnight Dewar Tried To Misbehave With Bhabhi When Her Husband Not At Home Indore MP

भावजयीच्या खोलीत रात्री 11 वाजता घुसला दीर, म्हणाला- \'ही\' गोष्ट आपल्यातच राहील...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहितेने दिरावर गंभीर आरोप केले आहेत. - Divya Marathi
विवाहितेने दिरावर गंभीर आरोप केले आहेत.

इंदूर - येथे एका विवाहितेने आपल्या दिरावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आणि सासूने त्याची साथ दिल्याचा आरोप केला आहे. पीडिता म्हणाली- खूप दिवसांपासून दिराच्या तिच्यावर वाईट नजर होती. पती जेव्हा शहराबाहेर गेला, तेव्हा रात्री उशिरा तो मोबाइल घेण्याच्या बहाण्याने खोलीत शिरला आणि फोनवर अश्लील व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे करायला लागला. कसेबसे मी दिराला रूमबाहेर ढकलले. यानंतर तो सातत्याने त्रास देऊ लागला. शेवटी त्रस्त होऊन विवाहितेने दिराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
> पीडित महिलेनुसार, दिराची नियत सुरुवातीपासूनच ठीक नव्हती. तो नेहमी येता-जाता छेड काढायचा. मी त्याचा खोडकरपणा समजून आधी दुर्लक्ष केले होते, पण काही दिवसांपासून तो मनमानी करायला लागला होता. माझे पती काही कामानिमित्त अहमदाबादला गेले होते, त्या दिवशी घरात फक्त मी, सासू आणि दीरच होते.
> रात्री 11 वाजता त्याने माझ्या रूमचे दार ठोठावले. मी विचारल्यावर म्हणाला- तुमच्या रूममध्ये माझा मोबाइल राहिलाय. मी दार उघडल्यावर तो दुसऱ्या मोबाइलवरून अश्लील व्हिडिओ दाखवू लागला. मी त्याला बाहेर जा म्हणाले, तर त्याने मला पकडून अश्लील चाळे केले. माझ्या विरोधानंतरही तो मला इथेतिथे स्पर्श करत राहिला. म्हणत होता- मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपल्या दोघात जे होईल ती गोष्ट बाहेर नाही जाणार. पण मी ओरडले तर त्याने मला जिवे मारण्याची धमकी दिली.

> पीडितेच्या म्हणाली, सकाळी उठल्यावर त्याने पुन्हा माझ्याशी अश्लील चाळे केले. हे सर्व पाहत असलेल्या सासूला मी रात्रीची घटनाही सांगितली. तर सासू म्हणाली की- मर्द तर काहीही करू शकतात. यामुळे त्याचे चाळे आणखीनच वाढले होते. पती गावाहून आल्यावर सासू आणि दिराने त्यांना माझ्याविरुद्ध भडकावले. त्याने मोबाइलवर मेसेजही केला की, ही माझ्या रूममध्ये रात्री 4 वाजता आली होती.
> कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी मी आतापर्यंत गप्प होते. पण आता मात्र सहन करण्यापलीकडे झाल्याने मजबुरीने मला तक्रार करावी लागली. मला माझ्या पतीसह राहायचे आहे. माझी काहीही चूक नाहीये. 
> महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिराविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली असून अधिक तपासानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...