आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाडमेरमध्ये लढाऊ विमानाला अपघात, वैमानिक सुखरूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाडमेर- वायुदलाच्या एका मिग-२१ लढाऊ विमानाला शनिवारी अपघात झाला. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुखरूप बचावले. वायुदलाच्या उत्तरलाई तळावरून या विमानाने शनिवारी ११ वाजून २८ मिनिटांनी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर पाऊण तासांनी तेथून १० किलोमीटर अंतरावरच या विमानाला अपघात झाला. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत हे विमान हवेतच गटांगळ्या खात होते. त्यानंतर नाथाराम नामक शेतकऱ्याच्या शेतातील एका झाडाला त्याची टक्कर झाली आणि विमान मोठ्या स्फोटासह खाली कोसळले. कोसळताक्षणीच विमानाचे दोन तुकडे झाले. तत्पूर्वीच वैमानिक नितीन सक्सेना आणि कॅप्टन व्ही. जयकर यांनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी घेतल्याने दोघांचेही प्राण वाचले. दोघांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.

या स्फोटाचा आवाज सुमारे १५ किलोमीटरपर्यंत घुमला. आगीचे लोळ पाहून त्या भागात काम करत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर तासाभरातच पोलिस, वायुदल प्रशासनाचे अधिकारीही पोहोचले. तज्ज्ञांच्या मते, उड्डाणानंतर ३२ मिनिटांत विमानाचा मागचा भाग जाम झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फायटर विमानाचे झाले दोन तुकडे
बातम्या आणखी आहेत...