आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिग विमान घरात घुसले तरी कोणाला साधे खरचटलेही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जोधपूर हवाई तळावरून सोमवारी सकाळी ११.३० वाजता प्रशिक्षण उड्डाणादरम्यान हवेत झेप घेतलेले मिग-२७ हे लढाऊ विमान कुडी भगतासनीच्या महावीरनगरात कोसळले. विमान घराचा वरील भाग, दोन कार, वीज आणि टेलिफोनचे खांब आणि रिकाम्या प्लॉटवरील संरक्षक भिंत तोडून एका घराच्या किचनमध्ये घुसले. विमान घरात घुसले तरी कोणालाही इजा झाली नाही.

तज्ज्ञांच्या प्राथमिक तपासानुसार, उड्डाणानंतर विमान शहराबाहेर ७-८ किमीपर्यंत गेले होते. तेव्हा वैमानिकाला इंधन गळतीची माहिती मिळाली. वैमानिकाने एटीसीकडे लँडिंगची परवानगी मागितली. एटीसीने धावपट्टी रिकामीही केली. पण विमान परतताना इंधन संपले आणि इंजिन हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली. त्यामुळे वैमानिक दीपक कांडपाल यांनी रिकामा प्लॉट शोधून विमान ऑटो मोडमध्ये टाकले, नंतर विमानातून सीट इजेक्ट करून बाहेर पडले. त्यामुळे प्राणहानी झाली नाही. अपघाताच्या वेळी घरातील लोक दुसऱ्या खोलीत होते. त्यामुळे तेही सुरक्षित आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, कोसळण्याआधी विमानाची गती कमी झाली होती. इंधन नसल्याने विमानात वेगाने आग लागली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. घरांनाही आग लागली असती.

पुढील स्लाइडवर वाचा, कोणाचा जीव तर गेला नाही ना?’
बातम्या आणखी आहेत...