आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिग-29 : नौदलाला मिळाले आकाशी झेपावणारे बळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - देशाच्या सीमांवर आकाशातून नजर ठेवणार्‍या आणि शत्रूला धडकी भरवणार्‍या मिग-29 या लढाऊ विमानांचा ताफा नुकताच नौदलात औपचारिकरीत्या सामील झाला. मिग-29 च्या ‘की ब्लॅक पँथर’ स्क्वॉड्रनमध्ये सुरुवातीला 16 लढाऊ विमाने असतील. आधुनिक युगाला साजेशी ही लढाऊ विमाने फेब्रुवारी 2010 मध्ये नौदलात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. ‘आयएनएस हंस’वर आयोजित एका कार्यक्रमात संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी हे लढाऊ विमान देशाला सर्मपित केले.

शत्रूचा उडेल थरकाप
हे अतिशय बलाढय़ लढाऊ विमान आहे. यात अत्याधुनिक विमानवेधी, जहाजवेधी क्षेपणास्त्रे, अचूक लक्ष्यभेद करणारे बॉम्ब आणि आधुनिक प्रणालीसह इतर शस्त्रास्त्रे आहेत.

आणखी वाढेल शक्ती
आयएनएस विक्रमादित्य हे विमानवाहू जहाज या वर्षअखेरीस नौदलात सामील होण्याची शक्यता आहे. या जहाजामुळे नौदलाची बहुउद्देशीय क्षमता मजबूत होईल.

या वर्षी सामील होईल बोइंग पी-8 आय
पणजी. भारतीय नौदल आपल्या ताफ्यात बोइंग पी-8 आय पोसायडन विमान सामील करणार आहे. सध्या हे विमान फक्त अमेरिकी नौदलाकडेच आहे. हे विमान सामील झाल्यानंतर भारताचा त्यात दुसरा क्रमांक असेल. पी-8 आय हे दीर्घ पल्ल्याचे टेहळणी करणारे व पाणबुडीभेदी विमान आहे. नौदलातील एका अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही रशियन टीयू 142 एम आणि पोसायडनसाठी 2009 मध्ये निविदा जारी केली होती. हे विमान समुद्रावर खूप उंचावरून उडते आणि शेकडो किलोमीटर अंतरावरील जहाजे, विमाने व पाणबुड्यांची माहिती देते.

अँटनींची इतिहासात नोंद
एखाद्या विमानवाहू जहाजावर लढाऊ विमान उतरवणारे पहिले संरक्षणमंत्री म्हणून ए. के. अँँटनी आता ओळखले जातील. हे उड्डाण मिग-21 विमानाच्या सिम्युलेटरमध्ये करण्यात आले आणि त्यांचे सहवैमानिक होते नौदलप्रमुख अँडमिरल डी. के. जोशी. लँडिंगनंतर अँटनी म्हणाले की, ‘वैमानिकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचा आज अनुभव आला आहे.’