आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mild Stampede Outside Pwd Guest House In Saifai Where Cm Akhilesh Yadav Is In Meeting

सैफईतील कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी, सहा जखमी; अखिलेश यांच्या जनता दरबारातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटावा- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या सैफई या गावात रविवारी घेतलेल्या जनता दरबारात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका जिल्हा पंचायतीच्या प्रमुखासह जण जखमी झाले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक रामकिशन यादव यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात अखिलेश यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी विश्रामगृहाबाहेर मोठी गर्दी उसळली होती. जमावाला दूर ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते, पण एक व्हीआयपी कार आत जाऊ देण्यासाठी ते उघडण्यात आले आणि लोक आत घुसले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कन्नौज जिल्हा पंचायतीचे प्रमुख संतोष यादव यांच्यासह जण जखमी झाले. एकाच्या डोक्याला जखम झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लोकांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलत असताना जमाव त्यांच्या दिशेने सरकला आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद््भवली. काही जण खाली पडल्याने जखमी झाले. त्यात माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. सर्व जखमींना सैफई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखिलेश यांनी या वेळी लोकांशी संवाद साधला तसेच त्यांची गाऱ्हाणी एेकून घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. त्यानंतर ते सैफईतील आपल्या कुटुंबाच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी रवाना झाले. लखनऊ ते सैफई या २०० किमी लांबीच्या महामार्गावर अनेक ठिकाणी अखिलेश यांचा ताफा रोखला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

अपेक्षेपेक्षा लोकांची गर्दी झाली जास्त
समाजवादी पक्षातील कलह चव्हाट्यावर आल्यानंतर अखिलेश यांचा हा पहिलाच सैफई दौरा होता. अखिलेश आल्याचे कळताच हजारो लोक त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमस्थळी जमा झाले. अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमा झाल्याने पोलिसांनाही त्यांना आवरणे कठीण झाले होते.
बातम्या आणखी आहेत...