आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांचे शीर कापणाऱ्याला कंठस्नान, आता शहीद कुटुंबीयांनी मागितले शीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कराच्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी अन्वर. - Divya Marathi
लष्कराच्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी अन्वर.
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात ज्या दहशतवाद्याला नुकतेच कंठस्नान घालण्यात आले त्याचे संबंध 2013 मध्ये भारतीय जवान हेमराज आणि सुधाकर यांचे शीर कापणाऱ्या संघटनेबरोबर होते. अन्वर नावाचा हा दहशतवादी भारतीय सीमेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना सोमवारी लष्कराच्या कारवाईत मारला गेला होता. हे वृत्त समोर येताच शहीद हेमराजच्या पत्नीने या दहशतवाद्याचे शीर देण्याची मागणी केली. ज्याप्रमाणे आमच्या जवानांने शीर नेले तसेच त्यांचे शीर देण्याची त्यांची मागणी आहे. हा दहशतवादी पाकिस्तानचा राहणारा असल्याचे लष्कराचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले. त्याचे सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले. मात्र घटनास्थळाहून मोठ्याप्रमाणावर दारुगोळा मिळाला आहे.

प्रकरण काय?
एलओसीला लागून असलेल्या पुंछ सेक्टरमध्ये आठ जानेवारी 2013ला हेमराज आणि सुधाकर या दोन भारतीय जवानांची हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानी रेजर्ससह काही दहशतवादी सीमा पार करुन आले आणि त्यांनी हेमराजसह सुधाकरचे शीर कापून सोबत नेले होते. यूपीच्या मथुरातील रहिवासी 38 वर्षीय हेमराज हा राजपुताना रायफल्समध्ये तैनात होता. तर सुधाकर मध्य प्रदेशचा राहणारा होता. तेव्हापासून लष्कर हेमराजच्या मारेकऱ्यांच्या शोधात होते.

काँग्रेसला द्यायचा आहे पुरस्कार
दहशतवाद्याला मारणाऱ्या पथकाला प्रमोशन दिले जावे, अशी मागणी शहीद हेमराजच्या पत्नीने केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सचिव कुंवर नरेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना मारणाऱ्या टीमला एक लाखांचे बक्षीस देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो...शहीद हेमराजच्या कुटुंबाचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...