आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा LoC वर मोर्टार अटॅक; काश्मीरात 4 तासांत 6 दहशतवादी हल्ले, 13 जवान जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद्यांनी चार हल्ले हे दक्षिण काश्मीरमध्ये तर दोन हल्ले हे उत्तर काश्मीरात केले आहेत. हे सर्व हल्ले चार तासात करण्यात आले आहेत. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
दहशतवाद्यांनी चार हल्ले हे दक्षिण काश्मीरमध्ये तर दोन हल्ले हे उत्तर काश्मीरात केले आहेत. हे सर्व हल्ले चार तासात करण्यात आले आहेत. (संग्रहित फोटो)
श्रीनगर- पाकिस्तानने बुधवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेजवळ बिमबेर गली सेक्टरमध्ये तोफा डागल्या. काश्मीरात एकाच दिवसात सीआरपीएफ, पोलिस आणि लष्करावर 6 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 13 जवान जखमी झाले आहेत. मंगळवारी पुलवामा, पहलगाम, उत्तर काश्मीरमधील पजलपोरा (सोपोर) येथे हल्ले झाले आहेत. अनंतनाग येथे दोन पोलिसांकडून शस्त्रे पळवण्यात आली. सोमवारी आणि रविवारी सीआरपीएफवर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 6 जवान जखमी झाले होते.

येथे झाले हल्ले

1# त्राल (पुलवामा)
- पुलवामातील त्राल येथे CRPF कॅम्पवर दहशतवाद्याने ग्रेनेड हल्ला केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेनेड कॅम्पच्या परिसरात फेकण्यात आला होता. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले आहेत.
2# पद्गमपोरा (पुलवामा)
- पुलवामा येथील पद्गमपोरा भागात CRPF जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. तुकडीवर दुचाकीवर जाणाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
3# पोलिस ठाणे, पुलवामा
- पुलवामा येथील एका पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. याठिकाणी कोणीही जखमी झाले नाही.
4# सरनाल (पहलगाम)
- पहलगाम येथील सरनालमध्ये CRPF कॅम्पवर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला.
5# पजलपोरा (सोपोर)
- उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे पजलपोरा येथे दहशतवाद्यांनी 22 राष्ट्रीय रायफल्सच्या शिबिरावर गोळीबार केला. लष्कराने प्रतित्त्यूर देताच ते पळून गेले.
6# अनंतनाग
- येथील आंचीदोरा भागात एका निवृत्त न्यायाधीश मो. अतहर यांच्या घरासमोर दोन पोलिसांवर हल्ला करुन त्यांच्याकडील शस्त्रे दहशतवाद्यांनी पळवून नेली. या घटनेत 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
 
अमरनाथ यात्रेपूर्वीच झालेत हल्ले

- एकाच दिवसात झालेल्या 6 दहशतवादी हल्ल्यांना अमरनाथ यात्रेशी जोडुन पाहिले जात आहे. अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरु होत आहे. ही यात्रा पहलगाम आणि बालटाल मार्गाने पुर्ण केली जाते. पहलगाम या भागात फुटिरतावाद्यांच्या कारवाया वाढल्या असून निर्दशने आणि दहशतवादी हल्ले वाढलेले आहेत. अमरनाथ यात्रेसाठी 30 हजार लष्करी जवान तैनात करण्यात येणार आहेत.