आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्‍ये 4 दिवसात तिसऱ्यांदा घुसखोरी, घरात लपून दहशतवाद्यांची फायरिंग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - पाकिस्तानाकडून दहशतवादी सलग घुसखोरीच्‍या प्रयत्‍नात आहेत. चार दिवसांमध्‍ये घुसखोरीचे हे तिसरे प्रकरण समोर येत आहे. शुक्रवारी सकाळपासून काश्‍मीरच्‍या सोपोर भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्‍ये चकमक सुरू आहे. दरम्‍यान एका दहशतवाद्याचा खात्‍मा झाल्‍याची माहिती आहे. तर, एका घरात दडून बसलेले दहशतवादी मोठ्या प्रमाणावर फायरिग करत आहेत. चार दिवसात आर्मीने येथे 6 दहशतवाद्यांचा खात्‍मा केला. त्‍यासाठी दोन जवानांना शहीद व्‍हावे लागले. आधीही दोनवेळा घुसखोरी..
- याआधी काश्मीरमध्‍ये लाइन ऑफ कंट्रोलजवळ कुपवाडा जिल्‍ह्याच्‍या टंगधार सेक्टरमध्‍ये गुरुवारी जवानांनी घुसखोरीचा प्रयत्‍न हाणून पाडला.
- सकाळी सेनेच्‍या जवानांनी सिमेवर दहशतवाद्यांची हालचाल पाहिली. दरम्‍यान त्‍यांना घेरत जवानांनी फायरिंग सुरू केली. यामध्‍ये दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा झाला आहे. काही दहशतवादी जंगलात दडले आहेत.
- दहशतवाद्यांच्‍या हल्‍ल्यात हवलदार प्रेम बहादूर शहीद झाले.
- त्‍यानंतर कमांडोंनी दुपारी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्‍मा केला.
- याआधी 13 जूनला मछल सेक्टरमध्‍ये झालेल्‍या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. जवान अजय सिंह चौधरी शहीद झाले. तर, चार जवान जखमी झाले आहेत.
5 महिन्‍यात 50 दहशतवाद्यांनी केली घुसखोरी..
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे.
- 2016 च्‍या सुरूवातीच्‍या 5 महीन्‍यांमध्‍ये 50 हून अधिक दहशतवादी काश्‍मीरात दाखल झाल्‍याची माहिती आहे.
- 2015 मध्‍ये जानेवारी ते एप्रिल दरम्‍यान अशी कोणतीही घटना समोर आली नव्‍हती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...