आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी जुनैद मट्टूच्या मय्यतमध्ये पोहचली अतिरेक्यांची टोळी, हवेत बेछूट गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अंत्ययात्रेत 4 ते 5 सशस्त्र दहशतवादी सहभागी झाले. - Divya Marathi
या अंत्ययात्रेत 4 ते 5 सशस्त्र दहशतवादी सहभागी झाले.
श्रीनगर - लश्कर ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी जुनैद मट्टू याच्या दफनविधी पूर्वी काढण्यात आलेसल्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांच्या टोळीने खुलेआम उपस्थिती लावली. एवढेच नव्हे, तर कुलगाम येथे शनिवारी पार पडलेल्या या अंत्ययात्रेत त्यांनी हवेत बेछूट गोळीबार केला. हे क्रूरकर्मा गोळीबार करत असताना दफनविधीसाठी आलेले इतर लोक त्यांना घोषणा देत प्रोत्साहित करत होते. काश्मिरच्या अरवानी गावात शुक्रवारी सुरक्षा रक्षकांनी मट्टूसह तिघांना कंठस्नान घातले.
 
- जुनैद मट्टूच्या अंत्यविधीला शनिवारी जवळपासच्या अनेक गावांमधून लोक आले. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रमुख्याने 4 ते 5 दहशतवादी सुद्धा दिसून आले आहेत. हे दहशतवादी अंत्ययात्रेमध्ये हवेत जोरदार फायरिंग करत होते. 
 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मट्टूच्या दफनविधीपूर्वी जनाजेची नमाज अदा करण्यात आली. कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी स्थानिकांना या दफनविधीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. 
बातम्या आणखी आहेत...