आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटीरवाद्यांचा बंदचा आदेश झुगारला; सोपोरमध्ये तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - सुमारे चार महिन्यांनंतर काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. लोक फुटीरवाद्यांचे फर्मान धुडकावून लावत आहेत. वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून काही ठिकाणी तर ट्रॅफिक जामचे चित्र आहे. कोपऱ्या-कोपऱ्यावरील दुकानेही उघडली आहेत. एक डिसेंबरपर्यंत बंदचा आदेश देणारे फुटीरवादी दुकाने उघडल्यामुळे त्रस्त आहेत. गुरुवारी सोपोरमध्ये फुटीरवाद्यांचा आदेश न मानल्याबद्दल त्यांच्या समर्थकांकडून सुमारे सहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
श्रीनगरव्यतिरिक्त काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांत गुरुवारी रस्त्यांवर गर्दी होती, दुकाने उघडली होती. अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जामची स्थिती होती. राज्यात आता रेल्वे-बस सेवा पूर्णपणे सुरू झाली आहे. इंटरनेट, मोबाइल सेवा सुरू झाली आहे. शाळा-महाविद्यालये, दुकाने, सरकारी तथा खासगी कार्यालये सुरू झाली आहेत. बँका आणि पेट्रोलपंपांवर गर्दी आहे लोक नेहमीप्रमाणे खरेदी करत आहेत. दरम्यान, फुटीरवाद्यांनी अनेक भागांत बैठका घेऊन लोकांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, पण कोणीही त्यांचे एेकत नाही.
घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न अपयशी
लष्कराने काश्मीरच्या दोन भागांत घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न उधळून लावले. गोळीबारानंतर दहशतवादी पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुलमर्ग तसेच नौगाम भागात रात्री उशिरा आणि सकाळी घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. दहशतवाद्यांचा एक गट अंधाराचा फायदा घेऊन भारतीय सीमेकडे येऊ लागला. नियंत्रण रेषेवर सतर्क दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता हा गट पाकिस्तानी सीमेकडे परतला.
बातम्या आणखी आहेत...