आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Militants Used Us Made Rocket Launchers To Target Indian Army Men In Manipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी हल्ल्यात 20 जवान शहीद, अमेरिकन रॉकेट लॉन्‍चरचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ- मणिपुरमधील चंदेल जिल्ह्यात गुरुवारी लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अमेरिकन रॉकेट लॉन्‍चरचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात दहशतवाद्यांनी रॉकेट लॉन्चर्सचा वापर केल्याची ही पहिलीच घटना आहे. या 20 जवान शहीद तर 10 जखमी झाले. मागील काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. शहिदांमध्ये एका जेसीओचा समावेश आहे. चार जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग हे आज (शुक्रवार) इम्फाळला पोहोचले. वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा करून त्यांनी चंदेल येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

लष्कराने सुरु केले सर्च ऑपरेशन
दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणापासून म्यानमारची सीमा अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हल्लेखोर सीमा ओलांडून म्यानमारमध्ये निघून गेले असावेत, अशी शंकाही सुरक्षा एजन्सीने व्यक्त केली आहे. लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले असून म्यानमारचे सहकार्य घेतले जात आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी रात्रीच सर्ज ऑपरेशन राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे. परंतु सर्च ऑपरेशन कोणत्या भागात राबवण्यात येत आहे, याविषयी गोपनियता पाळण्यास सांगण्यात आले आहे.
माउंट सारामतीवर लपले दहशतवादी?
भारत आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या माउंट सारामतीच्या 13 हजार फुट उंचीवर असलेल्या गावामध्ये दहशतवादी लपले असल्याचा लष्कराला संशय आहे. या गावांत आदिवासी लोक राहातात.
दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कार्रवाई करण्‍याचे आदेश दिले आहेत. तसेच नक्षलवादासह दहशतवाद नष्ट करण्यासाठी नवी रणनीती आखली जाईल, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
नवी अंब्रेला संघटना बनली डोकेदुखी
अरुणाचल प्रदेश आणि नागालंडमध्ये नुकताच हल्ला करणाच्या नॉर्थ ईस्टच्या नक्षली समुहांत घनिष्ठता वाढत आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. गेल्या एप्रिलमध्ये यूनाइटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न- साउथ ईस्ट आशियाने 'अंब्रेला संघटनेची स्थापना केली. यात NSCN (Khaplang) सह अनेक संघटनांचा समावेश आहे. अंब्रेला संघटनेमुळे सुरक्षा यंत्रणेची डोकेदुखी वाढवली आहे. अंब्रेलाने सरकारसोबत चर्चा करण्यास स्पष्‍ट नकार दिला आहे. मणिपुरमध्ये लहान-मोठ्या 40 नक्षली संघटना आहेत. जवळपास 20 संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारसोबत सीजफायर करार केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, इम्फाळपासून 80 किलोमीटर अंतरावरील मोलटुक खो-यात दहशतवाद्यांनी लष्काराच्या जवानांवर हल्ला केला. लष्कराच्या कारवाईत एक अतिरेकी मारला गेला, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल रोहन आनंद यांनी सांगितले. 6- डोग्रा रेजिमेंटचे पथक गस्तीवर असताना पॅरॉलाँग आणि चराँग दरम्यान दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी शक्तिशाली आयईडी स्फोट आणि ग्रेनेड डागल्याचे लष्कराने सांगितले. या ताफ्यात चार वाहने होती.

पीएलएवर संशय
पीपल्स लिबरेशन आर्मीने कांगलेई यावोल कन्ना लुप नावाच्या संघटनेशी हातमिळवणी करून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असावा, असा संशय मणिपूरचे गृह सचिव जे. सुरेश बाबू यांनी व्यक्त केला. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटवरही शंका असल्याचे बाबू म्हणाले.

दिल्लीत तातडीची बैठक
हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिल्लीत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व लष्करप्रमुखांची तातडीची बैठक घेतली. हा हल्ला भ्याडपणा आहे, असे ते म्हणाले. नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर. जेलियांग यांनी गृहमंत्री राजनाथ सिंहांशी चर्चा केली. एप्रिलमध्ये नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या ट्रक्सवर हल्ला झाला होता.

13 वर्षांतील घातक अतिरेकी हल्ला
गेल्या 13 वर्षांतील लष्करावरील हा सर्वांत घातक हल्ला आहे. यापूर्वी मे 2002 मध्ये जम्मू- काश्मीरच्या कालुचकमध्ये लष्करी छावणीवरील हल्ल्यात 31 जवान शहीद झाले होते. मागच्या महिन्यात त्रिपुरातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा मागे घेण्यात आला, अशावेळी हा हल्ला झाला.

शहिदाला सलाम : मोदी
हल्ल्यातील प्रत्येक शहिदाला माझा सलाम. हा हल्ला अत्यंत वेदनादायी आहे. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.