आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : राजस्थानात वाहिली दुधाची नदी; ही देवाची कृपा नाही, तर माणसाची चुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टँकर पलटल्यावर अशा प्रकारे दुधाची नदी वाहायला लागली)

सिरोही (राजस्थान) -
गुजरात डेअरीचे दूधाने भरलेले एक टँकर सोमवारी बाहीराघाटा येथे चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन पलटल्याने बाहीराघाटात दुधाची नदी वाहायला लागली. डोंगरावरून खाली दुधाचे झरे वाहायला लागले. दूधाने जेथे मार्ग मिळेल तिकडे वाहण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार या टँकरमध्ये 25 हजार लीटर दूध होते.
या घटनेनंतर ड्रायव्हर आणि त्याचा सहयोगी यांनी पळ ठोकला. मात्र जवळपास राहणार्‍या लोकांनी ड्रम आणि भांडे कुंडे घेऊन ट्रकच्या दिशेने धाव घेतली. टँकरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुध होते की, या झर्‍यांनी काही ठिकाणी दुधाच्या धबधब्याचे स्वरूप धारण केले होते. मागील दोन वर्षात याच ठिकाणी दुधाचे टँकर पलटत आहेत. मागील वर्षी 18 ऑक्टोबरला याच ठिकाणी एक दुधाचे टँकर पलटले होते, तर त्यापुर्वी 17 ऑक्टोबर 2012 लाही याच ठिकाणी असाच अपघात झाला होता.
सोमवारी टँकर पलटी झाल्यानंतर या महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतुक खोळंबली होती आणि पावसाळ्यात ज्या खड्ड्यांमध्ये पाणी साठते तेच खड्डे यावेळी दुधाने भरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुक सुरळीत केली. अनेक प्रयत्नांनी रस्त्यात आडव्या पडलेल्या टँकरला बाजूला हटवण्यात आले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या संपूर्ण घटनेचे फोटो