आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM Leader Akbaruddin_owaisi Attack On RSS And BJP Leader Sakshi Maharaj

ओवेसी म्हणाले- \'RSS ब्रम्हचार्‍यांचा क्लब, मुलांबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - ऑल इंडिया मुजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन (एमआयएम) नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टीका केली आहे. संघ म्हणजे 'ब्रम्हचार्‍यांचा क्लब' असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. भाजप खासदार साक्षी महाराज यांचे नाव घेऊन मुले जन्मास घालण्याचा सल्ला देण्याचा यांना अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान धर्मनिरपेक्ष नसल्याचाही आरोप ओवेसींनी केला आहे. एमआयएमच्या 57 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी हिंदू महिलांनी धर्म, देश आणि समाजाच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्माला घालावे असा सल्ला भाजप खासदार साक्षी महाराज यांनी दिला होता. त्यांचे नाव न घेता ओवेसींनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'मुलांच्या पालन-पोषणासंबंधी तुमच्याकडे कोणते धोरण आहे. मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न कसा सोडवणार.' असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.
संघावर टीका करताना ते म्हणाले, 'संघाचे सदस्य स्वतः कधीच लग्न करत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी घ्यायला ते तयार नसतात. पत्नी आणि मुलांचे प्रश्न काय आहेत, हे त्यांना माहित नसते. असे लोक इतरांना चार-चार मुले जन्माला घालण्याचा सल्ला देतात.'
मोदींच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, की जपानचे पंतप्रधान भारत भेटीवर आले असताना आपले पंतप्रधान त्यांना भगवत गीता भेट देतात, मग ते धर्मनिरपेक्ष कसे. त्यांनी भारतीय राज्यघटना जपानच्या पंतप्रधानांना भेट द्यायला हवी होती.
एमआयएम बिहार, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यात होणारी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. एमआयएम दलितांच्या अधिकारासाठीही लढणार असल्याचे यावेळी म्हणाले. सध्याचा काळ वाईट आहे, याकाळात मुस्लिमांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढले पाहिजे. नाही तर त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे ओवेसी म्हणाले.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, अकबरुद्दीन ओवेसींबद्दल अधिक काही