हैदराबाद- आमदार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे सध्या चर्चेत आहेत. MIM देशद्रोही संघटना असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर या पक्षाकडून त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, MIM च्या एका नेत्याने दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून MIM चा नेता मुलीचा शारीरिक छळ करीत होता. पण याची तक्रार करण्याची हिंमत पीडितेने केली नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये छळ वाढल्यानंतर तिने याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर एका समाजसेवी संस्थेला याची माहिती दिली. समाजसेवी संस्थेच्या मदतीने या नेत्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी तपास सुरू आहे.