हैदराबाद - प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या नऊ हजारावर आले आहे. त्यामुळे त्यांनी एमआयएमवर टीका करण्यास सुरुवात केली असल्याचे खासदार ओवेसी यांनी म्हटले आहे. सोलापूर मध्यमधून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांनी एमआयएमसंदर्भात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसला आमची गरज होती त्यावेळी त्यांना आमच्याबाबत काहीही अडचण नव्हती. पण आम्ही जेव्हा निवडणुकीत त्यांना आव्हान उभे करू लागलो, त्यावेळी त्यांना आम्ही दहशतवादी वाटतो, असे एमआयएमचे खासद असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काँग्रेस अडचणीत असताना त्यांच्या सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचे नेते आम्हाला विचारत होते. त्यावेळी त्यांना आमची भाषा देशद्रोहाची वाटली नाही, किंवा आमच्या संघटनेमध्ये काही गैरही जाणवले नाही. पण आता मात्र ते आम्हाला देशद्रोही म्हणून कारवाईची मागणी करत आहेत, असे ओवेसी म्हणाले. काँग्रेसला जर आमची भाषणे देशद्रोही वाटत असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावे. पण अशा प्रकारचे आरोप केल्यास त्यांना माफी मागावीच लागेल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआमएममुळे मुस्लीम मते यावेळी काँग्रेसकडे वळण्याऐवजी एमआयएमच्या उमेदवारांना पडल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळेच काँग्रेस एमआयएमला लक्ष्य करत असल्याची टीका ओवेसींनी केली.
काय म्हणाल्या होत्या प्रणिती?
या पक्षाने कधीही कोणत्याही एखाद्या समाजाविषयी
आपली आपली मते व्यासपीठावर मांडली नाही. त्याउलट त्यांची भाषा ही देशद्रोहाची आहे आणि देशद्रोहींना आपल्या देशात स्थान नाही. दहशतवादी आणि यांच्यात काय फरक आहे, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर बंदी लादायला हवी अशा शब्दांत प्रणिती शिंदेंनी टीका केली होती.
पुढील स्लाइड्वर पाहा, ओवेसींनी दिलेले प्रत्युत्तर...