ओंगोले - आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात कांडुकुर गावाजवळ व-हाडाचा ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या अपघातात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक एका बसवर आदळल्याने हा अपघात घडला.
कांडुकूरकडून लग्नाचे वऱ्हाड गेऊन येणारी ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनिबसवर जाऊन आदळल्याने अपघात झाल्याची माहिती याठिकाणी असलेल्या पोलिसांनी दिली. ट्रकमध्ये असलेल्यांपैकी 13 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. धडकेनंतर बसला आग लागली होती. या अपघातानंतर ट्रकचा चालक आणि त्याचा सहकारी घटनास्थळाहून फरार झाले. जखमींना ओंगोले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. ट्रकमध्ये सुमारे 40 जण होते. त्यातील अनेक जखमी झाले आहेत. बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.