आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुंड्यासाठी छळ केल्याचे सुनेने पोलिसांत तक्रार देताच मंत्रिमहोदय पत्नीसह पलायन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर / बालासोर - हुंडाविरोधी कडक कायदा असतानाही ओडिशा सरकारमधील एका माजी कायदामंत्र्यानेच हुंड्यासाठी छळ केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल सुनेने पोलिसांत तक्रार देताच मंत्रिमहोदयांनी पत्नीसह पलायन केले होते. या दोघांनाही शनिवारी पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. दरम्यान, मंत्र्याच्या मुलाच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली.


रघुनाथ मोहंती असे या माजी मंत्र्याचे नाव असून त्यांच्या सुनेने दाखल केलेल्या खटल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पत्नी प्रीतिलता मोहंती यांनाही हावडा येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ओडिशाचे पोलिस महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी दिली. मोहंती यांची सून बारसा स्वानी चौधरी यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 14 मार्चला त्यांनी गुन्हा दाखल केला. त्या वेळी रघुनाथ मोहंती हे नवीन पटनायक मंत्रिमंडळात कायदा आणि नगर विकास खाते सांभाळत होते. या प्रकरणात मुलगा राजाश्री मोहंतीला अटक होताच त्यांनी दुस-या दिवशी 15 मार्चला पदाचा राजीनामा दिला. राजाश्रीला कटकमधून 17 मार्चला अटक करण्यात आली. मोहंती यांच्यासह त्यांची मुलगी अर्थात राजाश्रीची बहीण रूपाश्री, जावई सुवेंदू मधुल यांच्याविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हुंड्यासाठी सुनेचा छळ । 25 लाख रुपये, लक्झरी गाडी
राज्यातील राजकारण तापले
रघुनाथ मोहंती यांच्या अटकेसाठी भाजपने निदर्शने केली होती. बास्ता मतदारसंघाचे आमदार असलेल्या मोहंती यांची मंत्रिपदाची ही पाचवी टर्म आहे. 2005 मध्ये ते मंत्री बनले होते. शुक्रवारपर्यंत मोहंती यांनी अटकेची कारवाई टाळली होती. त्यावर सत्ताधारी सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती.


दांपत्यांचे फोन टॅपिंग
मोहंती दांपत्य ज्या ठिकाणी दडून बसले होते ती जागा शोधताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यासाठी पोलिसांनी मोहंती यांच्या फोनची 50 वेळा टॅपिंग केली. संभाषणातून माहिती गोळा केली.


विशेष दलाने उचलले
मोहंती दांपत्य हावडा स्थानकाजवळील शालिमार येथील शांतिकुंज अपार्टमेंटमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष दलाने शनिवारी सकाळी ही धडक कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले.


बीजेडीतून हकालपट्टी
रघुनाथ मोहंती यांची बीजेडीच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांनी ही कारवाई केली आहे. मोहंती यांचा मुलगा राजाश्रीच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन आठवड्यांनी वाढ झाली आहे. बालासोर येथील सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. याअगोदर तीन कनिष्ठ न्यायालयांनी राजाश्रीचा जामीन नाकारला आहे.


पोलिसांचे आभार
पोलिसांनी योग्य ती कारवाई केल्याबद्दल त्यांची आभारी आहे. आणखी दोघांना अटक (रूपाश्री आणि तिचा पती) व्हावी, अशी अपेक्षा आहे. हे सर्व लोक छळास सारखेच जबाबदार आहेत. त्यांनी शारीरिक, मानसिक छळ केला.
वर्षा स्वानी चौधरी, पीडित सून.