आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये मंत्र्याच्या अंगरक्षकाकडून पत्रकाराला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरचे कृषिमंत्री गुलाम नबी लोण यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप स्थानिक इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने केला आहे. जावेद मलिक नामक या पत्रकाराच्या पत्नीवर सुरक्षा रक्षकांनी अश्लील टिप्पणी केल्याने हा वाद उद््भवला.

मंत्र्याकडे याविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला. मात्र, त्याच वेळी अंगरक्षकांनी मारहाण केल्याचे मलिक म्हणाले. जावेद मलिक आपल्या पत्नीसोबत स्थानिक बाजारात फिरत असताना कृषिमंत्र्यांच्या अंगरक्षकांनी अश्लील टिप्पणी केली. हा ताफा बाजारातून जात असताना पत्रकार व त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचे प्रत्यंतर मोठ्या वादात झाले. लोण यांच्या कारकडे जाण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला, मात्र सुरक्षा रक्षक त्या वेळी अधिक आक्रमक झाले. अद्याप हे प्रकरण कृषिमंत्र्यांच्या कानावर गेले नसल्याचे मलिक म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...