आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोनवर दीड मिनीटात 56 शिव्या देणारे मंत्री म्हणाले, तो माझा आवाज नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री विनोदकुमार उर्फ पंडित सिंह यांनी एका व्यक्तीला फोनवर शिव्या देत जीवे मारण्याची धमकी दिली. गोंडा येथील रहिवासी आकाश अग्रवाल या तरुणाने आरोप केला की मंत्र्यांशी संबंधीत एक लिंक सोशल साइटवर शेअर केली, त्यामुळे नाराज झालेल्या सिंह यांनी फोन करुन दीड मिनीटात 56 शिव्या दिल्या. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री महोदयांनी 'तो मी नव्हेच'चा राग आळवत माझा आवाज नसल्याचे म्हटले आहे. पंडित सिंह यांच्यावर त्यांच्या मर्जीतील डॉक्टर्सची नियुक्ती न केल्यामुळे एका सीईओला धमकावण्याचा आणि अपहरणाचाही आरोप होता.
काय आहे प्रकरण
एका स्थानिक वृत्तपत्रात उत्तर प्रदेशचे माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री विनोदकुमार सिंह यांच्या गाडीच्या काचांवरील काळी फिल्म काढल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. आकाश अग्रवाल या युवकाने त्या बातमीची लिंक सोशल मीडियावर शेअर केली. त्यानतंर मंत्री महोदयांनी त्याला फोन करुन दीड मिनीट शिव्यांची लाखोली वाहिल्याचा त्याने आरोप केला आहे. त्यानंतर पोलिस अधिकारी नितेश सिंह यांना त्याच्या दुकानावर पाठवून धमकावण्यात आले. फोनवर पंडित सिंह यांनी आकाशच्या वडिलांनाही धमकी दिली, की खोट्या केसमध्ये असे अडकवू की मेल्यानंतरच सुटका होईल.
आकाशने dainikbhaskar.com ला ती ऑडिओ क्लिप दिली आहे. त्यात सिंह जैन पिता-पुत्राला धमकावत असल्याचे स्पष्ट होते. सिंह त्या क्लिपमध्ये म्हणतात, 'तुम्ही माझे काहीही करु शकत नाही. मी एक मंत्री आहे. झालेच तर चौकशीसाठी एखादी समिती स्थापन होईल, दुसरे काही होणार नाही.'