आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिट फंड कंपनीकडून मंत्र्याने स्वीकारली कार, आसामच्या मुख्यमंत्र्यांची चुप्पी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - ओडिशाचे नागरी पुरवठामंत्री संजय दासवर्मा यांनी एका चिट फंड कंपनीकडून कार भेट स्वरूपात स्वीकारल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या प्रकरणी मौन स्वीकारले आहे, तर काँग्रेस आणि भाजप या विरोधी पक्षांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दासवर्मा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २६ एप्रिलला आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद हरिचंदन म्हणाले की, दासवर्मा यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. या चिट फंड कंपनीविरोधात सीबीआयची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीवर याचा परिणाम होईल. दुसरीकडे, चिट फंड कंपन्यांनी दासवर्मा यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या पाच कंपन्यांत गुंतवणूक केली आहे, असा आरोप भाजपने केला असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दासवर्मा यांनी अर्थतत्त्व ग्रुपचे सीएमडी प्रदीप सेठी यांच्याकडून पजेरो कार स्वीकारली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते ललतेंदू विद्याधर मोहपात्रा यांनी केला आहे. सेठी यांना सीबीआयने अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. दासवर्मा यांनी मात्र सेठी यांच्याकडून कार स्वीकारल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी या कारशी संबंधित कागदपत्रे सीबीआयच्या सुपूर्द केली आहेत. ही कार आपलीच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सीबीआयने दासवर्मा यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडील सर्व वाहनांची कागदपत्रे सादर करावीत, असे सांगितले आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी पैसा कोठून आणला, अशी विचारणाही सीबीआयने नोटिशीत केली आहे.