आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्ही. के. सिंह यांचे वादग्रस्त भाष्य, म्हणाले लष्कर आणि मीडियामध्येही विकाऊ लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह काही कामानिमित्त रायपूरमध्ये आले होते. या दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी बातचीत केली. गेल्या काही दिवसांपासून ज्या मुद्द्यांवर वाद, चर्चा व वक्तव्ये होत आहेत त्या सर्वांविषयी व्ही. के. सिंह यांनी या वेळी आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केली. त्यांच्याच शब्दांत...

प्रेस्टिट्यूट : मीडियातील बातम्या एेकून मी माझ्या डोक्यावर हातच मारला
माध्यमे अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दा उचलून धरतात. मी ‘प्रेस्टिट्यूट’ हा शब्द वापरला होता. त्यांनी त्याचा प्रॉस्टिट्यूट असा बोभाटा केला. हे अति झाले. त्यांनी किमान प्रेस्टिट्यूटचा अर्थ तरी गुगलवर शोधायला हवा होता. या शब्दाचा सर्वप्रथम वापर जॉर्ज फरान यांनी केला होता. फलांते यांनी या शब्दाला सार्वत्रिक केले. हा अपशब्द नाही. याचा अर्थ असा- एखाद्या माध्यमाची लेखणी कोणाच्या तरी प्रभावाखाली विकली गेली आहे. काही लोकांनी याचा अपप्रचार केला. मी माध्यमांना वेश्या म्हटल्याचा बोभाटा झाला. हे एेकून तर मी डोक्यावरच हात मारला. कोणाचे हित साधले गेले नाही तर असा अपप्रचार केला जातो. माध्यमांत विकली जाणारी मंडळी आहेत. येथे सुपारी-पत्रकारिता चालते. सर्वच माध्यमे खराब आहेत, असे नव्हे. ९० ते ९५ % माध्यमे प्रामाणिकपणे आपली जबाबदारी निभावत आहेत. केवळ ५% माध्यमे इतरांच्या प्रभावाखाली बातम्यांचे नियोजन करतात. तथ्यांशी प्रतारणा केली जाते. संरक्षण मंत्रालयातही अशी एक लॉबी आहे, जी दलाली करते. मलाही विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ते शक्य न झाल्याने माध्यमांचा वापर माझ्याविरुद्ध करण्यात आला.

पाकिस्तानी दिवस : माध्यमांना रंगही माहीत नसावा?
२३ मार्चला तिथे नवे काहीच झाले नाही. दरवर्षी देशातील एक राज्यमंत्री तिथे उपस्थिती लावतो. तिथे फुटीरतावादीही असतात.