आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister's Son Hanging Up In Scindia School Fort

ज्योतिरादित्य सिंधियांच्या शाळेत मंत्र्याच्या मुलाने घेतली फाशी, सध्या व्हेंटिलेटरवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बिहारचे मंत्री जय कुमार सिंह यांचा मुलगा आदर्श सिंह हा सिंधिया स्कूलमध्ये 9 व्या वर्गात शिकत होता.)

ग्वाल्हेर - सिंधिया स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणा-या एका मुलाने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा विद्यार्थी राज्याचे मंत्री जय कुमार सिंह यांचा मुलगा आदर्श सिंह हा आहे. ही घटना बुधवारी रात्रीची असल्याचे सांगितले जात आहे. हॉस्टेलच्या खोलीत आदर्श बेशुद्धावस्थेत आढळला. त्यानंतर त्याला एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर दिल्लाच्या अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगतिले जात आहे.

रात्री उघडले डोळे
दिल्लीच्या अपोलो रुग्णालयाच आधर्शने रात्री उशीरा तीन चार वेळा डोळे उघडल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मंत्र्यांचे नीकटवर्तीय असलेल्या अखिलेश यांनी आदर्शचा गळा दाबण्यात आल्याचे सांगितले. त्याच्या गळ्यावर जखमा आहेत. तर पटन्यातील आदर्शच्या मामांनी सांगितले की, 20 ऑगस्टला हॉस्टेलच्या वॉर्डननी त्यांना आदर्श जेवण करताना बेशुद्ध झाल्याची माहिती दिली होती.
शाळा व्यवस्थापनावर शंका
अशा प्रकारे विद्यार्थ्याने फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने शाळा व्यवस्थापनावरही सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. आदर्शने अशा प्रकारचे पाऊल का उचलले याबाबत बोलण्यास शाळेचा कोणताही अधिकारी तयार नाही. या घटनेने संपूर्ण शाळेत खळबळ पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कुटुंबीय आदर्शच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप लावत आहेत.

माध्यमांवर बंदी
शुक्रवारी माध्यमांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. यावेळी काही पत्रकार आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादही झाला. जेव्हा पत्रकारांनी इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली, त्यावेळी विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले.

रूम बदलण्याची केली होती मागणी
आदर्शच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आदर्शने तीन दिवसांपूर्वी आईला फोनवर काही विद्यार्थी त्रास देत असल्यामुले हॉस्टेलमधील रूम बदलायची असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे आदर्शच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा शाळेचे कर्मचारी आदर्शच्या खोलीत गेले त्यावेळी त्याच्या गळ्याला चादर गुंडाळलेली होती आणि सिलींग फॅनही जमिनीवर पडलेला होता.

रॅगिंग की दुसरे कारण
आदर्शने अशा प्रकारचे पाऊल का उचलले यावर सध्या खल सुरू आहे. त्याची एखाद्याने रॅगिंग केली म्हणून त्याने असे केले का? याबाबतही चौकशी करणे सुरू आहे. याठिकाणी दोन वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याने रॅगिंग होत असल्याचा आरोप केला होता, अशी चर्चा आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने ही शाळाही सोडली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटो...