आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मालगाडीसमोर फेकले, बॉयफ्रेंडवर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्मक फोटो)
रांची- झारखंडमधील लातेहर जिल्ह्यात एका 17 वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिला मालगाडीसमोर फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात पीडिता थोडक्यात बचावली असून गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर उपचार सुरु आहे. पीडितीच्या प्रियकराने हे कृत्य केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांत पीडितेच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, पीडितीच्या नातेवाईकांनी तिचा विवाह निश्चित केला होतो. परंतु, पीडितेला विवाह करायचा नव्हता. तिचे विजेंद्र (20) नामक एक युवकावर प्रेम आहे. त्यामुळे पीडितेने शुक्रवारी सकाळी घर सोडले. विजेंद्रला भेटली. मात्र, संध्याकाळी रेल्वे रुळाजवळ ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. पीडितेच्या पायाला गंभीर दुखपत झाली आहे. पीडितेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विजेंद्रवर संशय बळावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.


स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता आणि विजेंद्रमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु आहे. आरोपी विजेंद्रने शिक्षण अर्ध्यातच सोडले आहे. दोघांचे प्रेमसंबंधाला पीडितेच्या नातेवाइकांनी विरोध केला होता.