आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराबाहेर अंगणात खेळत होता चिमुकला, रडतच सांगितले- शेजाऱ्याने त्याच्यासोबत काय केले ते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 वर्षीय मुलावर शेजाऱ्याने अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडली. - Divya Marathi
8 वर्षीय मुलावर शेजाऱ्याने अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडली.

महोबा - यूपीच्या महोबामध्ये चौथीत शिकणाऱ्या 8 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. मुलगा संध्याकाळी घराबाहेर अंगणात खेळत होता. तेवढ्यात शेजाऱ्याने त्याला आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. सध्या पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- चरखारली पोलिस स्टेशन हद्दीत राहणारे विनोद (बदललेले नाव) म्हणाले - माझा 8 वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. तेव्हा शेजारी संपत यांचा मुलगा सत्यम एका मित्रासह तेथे आला आणि माझ्या मुलाला आपल्या घरी घेऊन गेला.
- त्याने आपल्या घरात नेऊन माझ्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. माझा मुलगा ओरडत होता पण त्यांनी सोडले नाही.
- मुलगा घरी आला तेव्हा तो वेदनांनी विव्हळत होता. माझ्या पत्नीने त्याला विचारल्यावर त्याने पूर्ण घटना सांगितली.
- मी आणि पत्नीने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.

 

चिमुकल्याने ऐकवली आपबीती
- चिमुकला म्हणाला- मी माझ्या मित्रांबरोबर घराबाहेर खेळत होतो. तेवढ्यात तो आला आणि म्हणाला- माझ्या घरी चल. मी सोबत गेलो  तेव्हा तो त्याच्या मित्राला म्हणाला- बाहेर लक्ष दे, कोणी येत तर नाहीये ना!
- त्याचा मित्र बाहेर पहारा देत होता आणि तो माझ्यासोबत घाण काम करत होता. मी त्याला म्हणालो, मला जाऊ दे, मला सोड, पण तो ऐकला नाही. त्याने माझे तोंड दाबले.\"

 

काय म्हणतात पोलिस?
- एसपी एन. कोलांची म्हणाले, माझ्याकडे केसची माहिती आली आहे. आम्ही मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. रिपोर्ट आल्यावर योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...