आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावजयीनेच केला दिराच्या मुलाचा खून, या कारणामुळे गेला चिमुकल्याचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावजयीनेच तिच्या पुतण्याचा बेदम मारहाण करून जीव घेतला. - Divya Marathi
भावजयीनेच तिच्या पुतण्याचा बेदम मारहाण करून जीव घेतला.
मुरादाबाद - येथे 5 दिवसांपूर्वी एका चुलतीतून आपल्या 2 वर्षांच्या पुतण्याला बेदम मारहाण करून खून केला. यानंतर त्याचे हात-पाय कापून पाच दिवस त्याचा मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्यात लपवला. खुनी महिला कुटुंबीयांसह त्याला शोधण्याचे ढोंग करत राहिली. दुर्गंधी सुटल्यानंतर एका गोणीत भरून कचऱ्याच्या ढिगात फेकून आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोकांनी मृतदेहाची हालत पाहिली तर सगळे भयचकित झाले होते. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना मऊ गावातील आहे. येथील शौकत मोठा मुलगा असलम आणि लहान मुलगा राजसोबत राहतात.
- मोठ्या मुलाचे लग्न वरिशा हिच्याशी झाले. तिचा आशू याला मुलाला जन्म दिल्यानंतर 2 दिवसांनी मृत्यू झाला.
- काही महिन्यांनी त्याने नूरबानोशी लग्न केले, तिला 5 मुले निशा, मोहसीन, शोएब, मझहर आणि अलफैज (2) झाले.
- तर लहान मुलाचे 7 वर्षांपूर्वीच राहिन हिच्याशी लग्न झाले. तिला 2 मुले आणि 2 मुली आहेत.
- यादरम्यान शौकतने रामपूर तांडा येथे जमीन खरेदी केली, तो ती दोन्ही मुलांमध्ये आणि नातू आशू यांना समान वाटणार होता.
 
मोठ्या दिराच्या मुलाचा घेतला जीव...
- सूत्रांनुसार, हीच बाब छोट्या सुनेला खटकली. ती जमीन दोन्ही भावांतच वाटण्यावर अडून राहिली. रोज वाद होऊ लागले.
- 27 ऑक्टोबर रोजी घरी कोणीही नव्हते. संधी साधून तिने मोठ्या दिराचा मुलगा अलफैजचा बेदम मारहाण करून जीव घेतला. मग मृतदेहाला घराच्या अंगणात वाळूच्या ढिगाराखाली लपवले.
- यानंतर नातेवाइकांसोबत ती त्याचा शोध घेण्याचे नाटक करू लागली. इकडे, 31 ऑक्टोबरला रात्री दुर्गंधी सुटल्याने तिने मृतदेह बाहेर काढला आणि एका गोणीत भरून कचराकुंडीत फेकून आली.
 
काय म्हणतात पोलिस?
- पोलिस निरीक्षक राजेश कुमार म्हणाले, 1 नोव्हेंबर रोजी मृ़तदेह कचराकुंडीतून हस्तगत करण्यात आला. वाळूच्या ढिगाऱ्यावर रक्त आणि दुर्गंधी आढळल्याने खुनाचा संशय कुटुंबीयांवरच आला. चौकशी केली असता मृत मुलाची चुलती हीच खूनी असल्याचे आढळले. खुनी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...