हैदराबाद - आंध्र प्रदेशातील विंजिग्राम येथील 17 वर्षीय दलित मुलीचा अक्षेपार्ह्य व्हिडिओ तयार करुन पाच जणांनी तिचा सलग चार महिने लैंगिक छळ केला. रविवारी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यानंत हे प्रकरण उजेडात आले आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे, की पीडित मुलीच्या घराशेजारी राहाणार्या आरोपी शिवाजीने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ इंटरनेट आणि सोशल साइट्सवर अपलोड करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने तिला धमकावून त्याच्या मित्राच्या रुमवर नेले. तिथे आरोपी शिवाजीचे प्रसन्नकुमार आणि श्रीकांत हे दोन मित्र आधीच उपस्थित होते. या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शिवाजीच्या आणखी दोन मित्रांनी, भानुप्रसाद आणि जितेंद्र यांनी मुलीवर पुढील काही महिने अत्याचार केले. त्यांनी या दुष्कर्माचाही व्हिडिओ तयार केला.
अत्याचाराने त्रस्त युवती स्वतःच्या घरातून गेली पळून
वारंवार होणार्या लैंगिक शोषणाने त्रस्त होऊन पीडित मुलगी तीन दिवसांपूर्वी स्वतःच्या घरातून पळून गेली होती. येथून पळून गेल्याने तरी
आपल्यावर होणार्या अत्याचारातून मुक्ती मिळेल असे तिला वाटले होते. रविवारी ती घरी परत आली. त्यानंतर तिने आई आणि मोठ्या बहिणीला आपबीती कथन केली.
बोबली उप विभागीय कार्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक म्हणाले, 'आरोपींविरुद्ध बलात्कार, अॅट्रॉसिटी आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.'
(प्रतिकात्मक छायाचित्र - महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात आंदोलन करणारे लोक.)