आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांच्या निरागस बाळाचा असा सापडला मृतदेह, पोलिसांच्याही डोळ्यांत आले पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात मंगळावारी एका लहानग्याचे कमरेपासून तुटलेले कलेवर सापडले, ते पाहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला. तीन महिन्यांच्या बाळाचे कलेवर कुत्रे तोंडात घेऊन गल्लीतून घेऊन फिरत होते. 
 
बाळाचा कमरेपासूनचा भाग गायब
- ही दुर्दैवी घटना कानपूर जिल्ह्यातील नौबस्ता पोलिस स्टेशन अतंर्गत घडली आहे. 
- येथील बसंत बिहारमधील हिंदू स्मशानभूमी जवळ कुत्रे एका लहानग्याचा मृतदेह तोंडात धरून फिरत होते.
- काही बाइकस्वारांची त्यांच्यावर नजर पडली, त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मृतदेह सोडविला. 
- स्थानिक रहिवासी प्रेमादेवींनी सांगितले, बाळाचा कमरेपासूनचा भाग गायब होता. प्रथमदर्शनी असे वाटते की कोणी तरी अतिशय निर्घृणपणे धारदार शस्त्राने बाळाचे तुकडे केले. 
- जर बाळाला स्मशानात दफन केलेल असते तर त्याच्या मृतदेहाला माती लागलेली असती. 
- कुत्र्याने लचके तोडलेले असते तर शरीरावर दातांचे व्रण असते, मात्र तसे काहीही दिसत नाही.
- स्थानिकांच्या सुचनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्मशानभूमीजवळ बाळाचा अर्धाभाग शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या हाती काहीही लागले नाही. 
  
पोलिस शोधू लागले अनेक प्रश्नांची उत्तरे 

- पोलिसांचे म्हणणे आहे की स्मशानभूमीत एक नवे कोरे कापड सापडले आहे. मात्र त्याला कुठे ही रक्ताचा थेंब लागलेला नाही. उलट बाळाचा मृतदेह रक्ताने माखलेला होता. 
- जर बाळाचा मृतदेह स्मशानभूमीत दफन केला गेला असता तर त्याच्या शरीर आणि कपडे मातीने भरलेले असते. 
- बाळाच्या शरीरावर कुत्र्यांचे दात किंवा पंजाचे निशाणही नाही.
- बाळाच्या बॉडीचा दुसरा भाग मिळत नसल्यामुळे तो मुलगा आहे की मुलगी हे देखिल कळत नाही. 
 
2 लोक आले होते स्मशानभूमीत 
 - आश्चर्याची बाब म्हणजे हिंदू स्मशानभूमीत नगरपालिकेचा एकही कर्मचारी नाही.
 - कोणीही येथे येऊन सहज खोदकाम करुन मृतदेह दफन करु शकतो. कारण येथे कोणतीच नोंद होत नाही.
 - शेजारी राहात असलेल्या मधु गुप्ता यांनी सांगितले, की 2 जानेवारीच्या सायंकाळी 2 जण बाळाचा मृतदेह घेऊन आले होते, आणि दफन करुन निघून गेले. परंतू ते बाळ साधारण 1 महिन्यांचे होते.
 - पोलिसांनी सर्व चौकशी करुन बाळाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. 
 
 पुढील स्लाइडमध्ये पाहा, निरागस बाळाचे फोटो.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...