आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नासाठी Whatsapp वर आला मुलाचा फोटो, चेहरा पाहताच तरुणीने घेतली फाशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात अंजलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती. - Divya Marathi
घरात अंजलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती.

आग्रा - न्यू आग्रा परिसरात शनिवारी 15 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती, परंतु मुलगा काळा होता. तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते, परंतु तरीही तिला सांगण्यात आले की, एकदा पाहून तर घे, मग बघू काय करायचे ते! पोलिस अधिकारी नरेंद्र कुमार म्हणाले की, कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. अजूनपर्यंत तक्रार मिळालेली नाही.

 

व्हॉट्सअॅपवर पाहिला होता मुलाचा फोटो
- पिंटू यांना तीन मुली आहेत, यातील दोन लहान आहेत आणि शाळेत जातात. मोठी मुलगी अंजलीने हायस्कूलनंतर शिक्षण सोडले होते, ती घरीच होती.
- आई नीलम म्हणाली की, अंजलीच्या लग्नाची बोलणी सुरू होती. व्हॉट्सअॅपवर फोटो पाहिल्यावर तिला तो पसंत पडला नाही. परंतु आम्ही म्हणालो होतो की, एकदा समोरासमोर पाहून घे, मग पुढे ठरवू.
- शनिवारी दुपारी ती घरी एकटीच होती, तिने कपडे धुतले आणि छतावर वाळवण्यासाठी गेली, पण पहिल्याच मजल्यावर आपल्या खोलीबाहेर पायऱ्यांवर कपडे ठेवले आणि खोलीत जाऊन ओढणीने गळफास घेतला.
- याप्रकरणी पोलिस अधिक तपास घेत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...