आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात दोरी, चेहऱ्यावर असंख्य चावे; विवस्त्रावस्थेत आढळली चिमुकली, घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरापासून 250 मीटर अंतरावर चिमुकलीचा मृतदेह आढळला. - Divya Marathi
घरापासून 250 मीटर अंतरावर चिमुकलीचा मृतदेह आढळला.
शहाजहांपूर- येथे 17 ऑक्टोबर रोजी एका 12 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह घरापासून अवघ्या 250 मी. अंतरावर आढळला. गळ्या दोरी बांधलेली होती. शरीरावर जागोजागी चाकूने भोसकल्याच्या आणि चेहऱ्यावर दाताने चावे घेतल्याच्या खुणा होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्काराचा खुलासा झाला आहे. डॉक्टरांच्या मते, मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरही खूप जखमा आढळल्या. तिचे ओठही चाव्यांमुळे कापलेले होते.
 
पोस्टमॉर्टममध्ये हे आढळले...
- ही घटना यूपीच्या शहाजहांपूर जिल्ह्याच्या रौजा परिसरातील आहे. कुटुंबीयांनुसार, मुलगी सकाळी घरापासून अडीचशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात धान कापायला गेली होती. दुपारपर्यंत परतली नाही.
- संध्याकाळी शेतात गेल्यावरही ती तेथे आढळली नाही. खूप शोध घेतल्यावर एका झुडपाजवळ तिचा मृतदेह आढळला. गळ्या दोरी बांधलेली होती. शरीरावर जागोजागी चाकूने भोसकल्याच्या आणि चेहऱ्यावर दातांनी चावे घेतल्याच्या खुणा होत्या.
- 18 ऑक्टोबरच्या रोजी 3 डॉक्टर (रितु रस्तोगी, अजय नागर आणि व्ही.के.गंगवार) यांच्या पॅनलने मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले.
- डॉक्टरांच्या मते, मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्येही जखमा आढळल्या. यामुळे तिच्यावर गँगरेप झाल्याची शक्यता आहे. ओठही कापलेले आढळले.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसपी के. बी. सिंह म्हणाले, प्रकरणाचा तपास सुरू आहे. इन्स्पेक्टर इफ्तिखार अहमद यांना लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. लवकरच आरोपी पोलिसांच्या कस्टडीत असतील.
 
मंत्री म्हणाले- आरोपींविरुद्ध कडक कारवाई करा...
- यूपीचे कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना म्हणाले, माझे पोलिस अधीक्षक आणि स्टेशन इंचार्जशी बोलणे झाले आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जावी. ही घटना समाजासाठी अभिशाप आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...