आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांच्या मुलीला मारून आईने वॉशिंग मशीनमध्ये लपवली डेडबॉडी, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला म्हणाली, माझ्याकडून मोठी चूक झाली. - Divya Marathi
महिला म्हणाली, माझ्याकडून मोठी चूक झाली.

गाझियाबाद - येथे एका महिलेने आपल्या 3 महिन्यांच्या मुलीची हत्या केली होती. एवढेच नाही, आपला गुन्हा लपवण्यासाठी तिने मुलीचा मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांखाली लपवला होता. घटना रविवारची आहे. महिलेच्या पतीने सोमवारी तिच्याविरुद्ध केस दाखल केली. महिलेला अटक करण्यात आली आहे.

 

आईनेच केली 3 महिन्यांच्या मुलीची हत्या
- ही घटना गाझियाबादची आहे. येथे राहणाऱ्या मोहितचे दीड वर्षांपूर्वी आरतीशी (22) लग्न झाले. 3 महिन्यांपूर्वी आरतीने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव शिवानी ठेवण्यात आले. रविवारी तिचा मृतदेह पोलिसांनी वॉशिंग मशीनमधून हस्तगत केला.
- चौकशीत आरती म्हणाली, रविवारी मी आणि मुलगी घरी एकटेच होतो. मोहित ड्यूटीवर गेले होते. ही संधी साधून मी शिवानीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांखाली झाकून ठेवला.
-यादरम्यान मोहित घरी आला आणि मुलगी गायब दिसल्याने विचारायला लागला. मी सांगितले की, मुलीला एक जनावर उचलून घेऊन गेले. यानंतर कुटुंबीयांनी बाहेर शोधाशोध सुरू केली. परंतु त्यांना काहीच सुगावा लागला नाही. सर्व जण घरी परत आले.
- तेवढ्यात पतीने कपडे शोधताना वॉशिंग मशीन उघडली. त्यांनी मुलीचा मृतदेह पाहिला आणि लगेच पोलिसांना फोन केला.
- खुनाचे कारण विचारल्यावर आरती आधी म्हणाली, माझ्याकडून मोठी चूक झाली, मी असे करायला नको होते. नंतर ती म्हणाली की, लग्नानंतर मला मुलगा व्हावा अशी इच्छा होती, पण मुलीने जन्म घेतला.

- एसपी ग्रामीण अरविंद मौर्य म्हणाले, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. खुनामागे यापेक्षा वेगळे काही कारण आहे का याबाबत तिची चौकशी सुरू आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...