आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉस्पिटल संचालक डॉक्टर आणि दोन वॉर्डबॉयचा अल्पवयीन मुलीवर गँगरेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया (उत्तर प्रदेश) - रुग्णसेवेची शपथ घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरने आणि दोन वॉर्ड बॉयने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. खासगी हॉस्पिटलचा संचालक असलेल्या डॉ. जे.पी. शुक्लावर आरोप आहे, की त्याने शनिवारी सायंकाळी त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका महिलेच्या अल्ववयीन (16 वर्षे) मुलीवर बलात्कार केला. आरोपी वॉर्डबॉय सर्वोत्तम चौबे आणि शिवम पांडे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलीची आई पोटात दुखत असल्याने बलिया येथील बांसडीह रोडवरील शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली. शनिवारी रात्री मुलगी तिच्या आईजवळ बसलेली होती, तेव्हा वॉर्ड बॉयने औषध देण्याच्या बहाण्याने तिला एका खोलीत बोलावून घेतले. तिथे इतर दोन जण हजर होते. त्या तिघांनी मिळून मुलीवर गँगरेप केला. मुलीचे म्हणणे आहे, की त्यावेळी तिचे वडील पैशांची तडजोड करण्यासाठी बाहेर गेले होते.
डॉक्टरला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
मुलीने संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉक्टरसह तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, पीडित मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे, की पोलिस मुख्य आरोप डॉक्टर शुक्लाला या प्रकरणातून सोडण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, घटनेशी संबंधित छायाचित्रे