आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई बाहेर जाताच शेजारी राहाणारा मुलगा करायचा बलात्कार, अल्पवयीन पीडितेवर लादले मातृत्त्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- शहरात एक 14 वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडिता आई बनल्याची घटना समोर आली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. सिजेरिअन डिलिव्हरीनंतर पीडितेची प्रकृती चिंताजनक बनल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, आई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर तिच्या शेजारी राहाणारा मुलगा तिच्यावर बलात्कार करत होता. तो तिला धमकावतही होता. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्‍यात आली आहे.

मुलगी प्रेग्नेंट असल्याचे आईला कळले तेव्हा...
- बलात्कार पीडित मुलगी प्रेग्नेंट असल्याचे तिच्या आईला कळले तेव्हा ती डॉक्टरकडे घेऊन गेली. पण फार उशीर झाला होता.
- गर्भ तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांचा होता. पीडितेच्या जीवाला धोका असल्याने गर्भपाताला डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला होता.
- 14 एप्रिलला पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...