आग्रा - अपहरणाच्या 44 दिवसानंतर समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव यांच्या घरात अल्पवयीन मुलगी सापडली आहे. अपहरणकर्त्यांनी सिकंदरा भागातील केके नगरमधून मुलीला पळवून आणले आणि दिड महिना डांबून ठेवले होते.
आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले आहे, की मला आमदारांच्या घरात डांबुन ठेवण्यात आले होते. पोलिसांवर आता आरोप होत आहे की, त्यांनी मुलीवर दबाव टाकल्यामुळे तिने जबाब बदलला. तिने म्हटले आहे, की यात आमदारांचा काहीही संबंध नाही.
अल्पवयीन मुलीचे काका श्रीकृष्ण यांनी सांगितले, की सिकंदरा पोलिस स्टेशनच्या अधिका-यांनी समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव यांच्या शिकोहाबाद येथील घरी छापा मारून 14 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले. सिरसागंज विधानसभा मतदार संघातून निवडूण आलेले हरिओम यादव समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांचे नातेवाईक आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, आमदार यादव म्हणाले मुलगी सापडल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून कळाली..