आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8वीतील मुलगी 3 महिन्यांची प्रेग्नंट, खोदून विचारल्यावर झाला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8वीची विद्यार्थिनी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे. - Divya Marathi
8वीची विद्यार्थिनी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे.
महोबा - येथे 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने एका भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. विद्यार्थिनी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे. एसपींच्या आदेशावरून आरोपी नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एवढेच नाही, आरोपी नेत्यावर सेक्स रॅकेट चालवण्याचाही आरोप आहे. याप्रकरणी एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
 
अॅडमिशन घेऊन देते म्हणून हॉटेलमध्ये नेले महिलेने...
-हे प्रकरण महोबा जिल्ह्यातील चरखारी पोलिसांतील आहे. येथे राहणारी सोनम (बदललेले नाव) 8वीची विद्यार्थिनी आहे. सोनम म्हणाली - मी यंदा परीक्षेत नापास झाले होते.
- माझ्या एका मैत्रिणी तिची आई रिताकडे मला घेऊन गेली. तिच्या आईने मला तुझे अॅडमिशन 9वीला घेऊन देते म्हणून सोबत नेले. एका दिवशी सकाळी रिता यांनी मला चांगल्या शाळेत अॅडमिशन करत असल्याचे सांगून सोबत हॉटेलात नेले आणि एका कमऱ्यात बंद केले.
- काही वेळाने त्या खोलीत भाजपचा शहराध्यक्ष हेमराज बुंदेला आला आणि त्याने माझ्यावर अमानुष अत्याचार केला. संध्याकाळपर्यंत तो माझ्यावर सतत अत्याचार करत राहिला. रेपदरम्यान त्याने माझा विवस्त्र व्हिडिओही रेकॉर्ड केला. नंतर मला सोडले.
- त्याने धमकी दिली की, जर मी हे कुणाला सांगितले तर माझा खून होईल. मी एवढी घाबरले होते की, याबाबत कुणालाच काही सांगितले नाही.
 
असा झाला खुलासा
- सोनम म्हणाली - 9 सप्टेंबर रोजी माझ्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. आईवडिलांनी मला जवळच्या दवाखान्यात नेले, तेथे डॉक्टरांनी काही टेस्ट करा म्हणून सांगितले.
- 10 सप्टेंबरला रिपोर्टमध्ये मी 3 महिन्यांची प्रेग्नंट असल्याचे आढळले. आईवडिलांच्या दबावामुळे मी त्यांना सर्वकाही सांगितले. 
- सोनमचे वडील म्हणाले- एसपींच्या आदेशावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- एसपी अनिस अहमद म्हणाले, आरोपी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पीडितेने ज्या महिलेचे नाव घेतले तिलाही कस्टडीत घेतले आहे. तिची चौकशीही सुरू आहे. पीडितेचे मेडिकल चेकअप करण्यात आले आहे.
- पोलिस सूत्रांनुसार, आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवते. आरोपी नेता यात तिची मदत करायचा.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...