आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको माहेरी गेली म्‍हणून दारुड्या बापाचा पोटच्‍या अल्‍पवयीन पोरीवर बलात्‍कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - येथील चकेरी पोलिस स्‍टेशनच्‍या परिसरातील ही घटना आहे. पत्‍नी माहेरी गेली म्‍हणून एका दारूड्या बापाच्‍या पोटच्‍या अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. पत्‍नीच्‍या माहेरी जाण्‍याला त्‍याचा विरोध होता. याचा बदला घेण्‍यासाठी त्‍याने हे कृत्‍य केल्‍याचे बोलले जात आहे. आरोपी बाप फरार आहे. पोलिसांनी बापाविरोधात गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्‍यात आले आहे. पत्‍नीच्‍या माहेरी जाण्‍याला पतीचा विरोध....
- चकेरी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत दीपक उर्फ दयानंद परिवारासोबत राहतो.
- दीपक हा व्‍यवसायाने गवंडी आहे. त्‍याला दारूचे व्‍यसन आहे.
- दीपकची पत्‍नी सुमन यांनी सांगितले की, 10 एप्रिलला त्‍या माहेरी गेल्‍या होत्‍या.
- दरम्‍यान दीपकला काही काम नसल्‍याने तो घरीच होता .
- पत्‍नीच्‍या माहेरी जाण्‍याला त्‍याचा विरोध होता. मात्र ती कामानिमित्‍त निघून गेली.
पीडित मुलीची आई म्‍हणाली..
-सुमन म्‍हणाली, मी दोन दिवसात येते असे सांगून मुलीला घरी ठेवले व निघून गेली.
- मी माहेराहून परतली तेव्‍हा पती फरार असल्‍याचे मला कळाले. मुलगीही शांत होती.
- रात्री उशीरापर्यंत पती दीपक घरी आला नाही. मी मुलीला विचारले. ती काहीच सांगत नव्‍हती.
- खूप वेळ तिला विचारल्‍यानंतर तिने घडलेली घटना सांगतली.
-बुधवारी सुमनने या पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटो....