आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्‍यात अल्‍पवयीन मुलीवर सामुहिक बलात्‍कार, 5 जणांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोव्यातील म्हापसा येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने याप्रकरणी तक्रार दिली. त्‍यानंतर 5 आरोपींना अटक करण्‍यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही घटना 20 दिवसांपूर्वी घडली होती. तिला एका आरोपीने घरी बोलावले होते. तिच्‍या आईला तिच्‍याशी बोलायचे आहे, असे सांगून तिला फस‍वले. परंतु, घरी पोहोचताच तिला बळजबरीने गुंगीचे औषध मिसळलेले पेय प्‍यायला लावले. त्‍यानंतर तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आला.

या प्रकारानंतर ती अतिशय भयभीत झाली होती. याबाबत घरी सांगण्‍याची तिची हिम्मत होत नव्‍हती. अखेर तिने सर्वप्रकार कथन केला. बलात्‍कारच्‍या घटनंतरही आरोपींकडून वारंवार तिच्‍यावर शारिरीक संबंधासाठी दबाव आणण्‍यात येत होता.

दरम्‍यान, पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्‍यात आली असून अहवाल अद्याप आलेला नाही.