आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Minor Girl Raped In Moving Train, Dumped Near Bilaspur Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीवर बलात्कार करून दहा रुपये दिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर - छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ हावडा-कुर्ला एक्स्प्रेसमध्ये नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. नराधमाने पीडित मुलीला स्थानकावर सोडताना दहा रुपयांची नोट दिली.

पीडित भक्त कानवरम बाजारात गंभीर अवस्थेत आढळली. तिचा रक्तस्त्रावही होत होता. यानंतर तिला छत्तीसगड इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसममध्ये शनिवारी दाखल करण्यात आले, अशी माहिती बिलापूरचे पोलिस अधीक्षक रतनलाल दांगी यांनी दिली. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. पीडित शुक्रवारी रात्री हावडा एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. शनिवारी पहाटे रेल्वेतील टॉयलेटमध्ये गेल्यानंतर नराधमाने बलात्कार केला. आरोपीने तिला दहा रुपयांची नोट देऊन बिलासपूर रेल्वे स्थानकावर उतरविले. पीडित मुलीच्या गंभीर अवस्थेमुळे तिचा जबाब नोंदवू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.