आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ वर्षाच्या बालिकेची बलात्कारानंतर हत्या; आईवडिलांसमोर घरातून उचलून नेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ/फैजाबाद - राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये नऊ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संगरुरपूर ठाण्याच्या हद्दीतील रामगड गावातील ही घटना असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

घटना
ए.एस.पी. पी मुन्नालाल यांच्या मते ही घटना गुरुवारी रात्री घडलेली आहे. पीडित मुलगी तिच्या आई वडिलांबरोबर झोपलेली होती, त्यावेळी काही शस्त्रधारी त्या मुलीच्या घरात घुसले आणि तिला बळजबरी उचलून नेले. त्यानंतर आरोपींनी या मुलीबरोबर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. बालिकेचा मृतदेह मिळाला त्यावेळी तिच्या तोंडातून आणि गुप्तांगातून रक्त निघत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कारवाई
घटनेबाबात माहिती मिळतातच जिलह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
फोटो - प्रतिकात्मक