आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Minor Girl Raped, Killed In Amethi, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींच्या अमेठीत महिला असुरक्षित? अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ/फैजाबाद- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीत एका सात वर्षीय मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या झाली आहे. या घटनेवरून अमेठीतील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अमेठी हा राहुल गांधी यांचा लोकसभा मतदार संघ आहे.

पीडित मुलीचे नराधमांनी तिच्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. संगरुरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगड येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, अद्याप पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

एएसपी पी मुन्ना लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात होती. काही लोक अचानक घरात घुसले आणि त्यांनी गुपचाप मुलीचे अपहरण केले. नराधमांनी मुलीवर बलात्कार केला व ‍गळा आवळून तिची हत्या केली. शुक्रवारी सकाळी पीडितेचा मृतदेह गावाजवळील शेतात आढळून आला. पी‍डितेच्या तोंडातून आणि गुप्तांगातून रक्त निघत होते.

घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचले. पीडित कुटूंबियान दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

(फोटोः अमेठीत अमानवतेची शिकार झालेल्या मुलीचा मृतदेह)