आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत होते प्रियकर अन् प्रेयसी, दरवाजा उघडला तेव्हा प्रेमीयुगुलाने सांगितली ही कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमुई (बिहार) - प्रेमप्रकरणानंतर एका प्रेमीयुगुलाने घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. यानंतर घरच्यांना ही बाब कळली तेव्हा त्यांना पकडून गावापासून दूर एका खोलीत बंद केले. गावकऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी तेथे धाव घेतली. यानंतर काही जणांनी कुलूप तोडून प्रेमीयुगुलाला घराबाहेर आणले. बाहेर आल्यानंतर या दांपत्याने पूर्ण कहाणी सांगितली.

 

मुलगी 10वीचा विद्यार्थिनी, मुलगा करतो मजुरी
- खोलीबाहेर आल्यावर मुलीने सांगितले की, ती 10वीची विद्यार्थिनी आहे. गुरुवारी लग्नानंतर तिने जेव्हा घरी ही गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या मामाने दोघांना येथे आणून खोलीत बंद केले. मुलीने सांगितले की, तिचा प्रियकर तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये मजुरी करतो. माझ्या मामाच्या घराजवळच मुलाचे घर आहे. आमची तेथेच भेट झाली आणि मग प्रेम झाले. यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.

 

आता कोर्ट मॅरेजची इच्छा
दांपत्याला येथून बाहेर काढल्यानंतर तरुणीने गावकऱ्यांसमोर कोर्टात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना बाहेर काढल्याचे कळताच कुटुंबीयांनी तेथे धाव घेतली. आणि आता दोघांचे रीतसर लग्न लावून देतो म्हणून सोबत नेले. दुसरीकडे, पोलिसांनाही हे प्रकरण कळले. पोलिस पोहोचेपर्यंत मुलगा आणि मुलीला घरचे घेऊन गेले होते. सूत्रांनुसार, मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...