आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minor Killed After Rape, Communal Tension In Latehar Village

आठवीत शिकणार्‍या मुलीची बलात्कारानंतर केली हत्या, जातीय तणाव वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवताना पोलिस

रांची -
झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात आठवीत शिकणार्‍या एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घूण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात जातीय तणाव पसरला आहे.
ही घटना शनिवारी लातेहार जिल्ह्यातील बालूमाथ ठाणे क्षेत्रातील बालू गावात घडली. मृत मुलगी तिच्या घरात झोपलेली होती. तिच्या शेजारी राहाणारा आरोपी वाहिद अंसारी (वय 28) याने भिंत ओलांडून मुलीच्या घरात प्रवेश केला. सुरूवातीला आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. आरडाओरडा ऐकून घरच्या लोकांनी दाराकडे धाव घेतली. मात्र वाहिदने भिंतीवरून उडी घेत धाव ठोकली. मुलीच्या कुटुंबियांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दुःखी आणि रागात असलेल्या कुटुंबियांनी आरोपीच्या घराला आग लावली. पीडिता आणि आरोपी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने परिसरात जातीय तणाव पसरला. पोलिसांनी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी वाहिदचा तपास सुरू केला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेचे इतर फोटो...
फोटो - सुरेंद्र गुप्ता