आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10th च्या विद्यार्थ्यांचे हे कसले प्रेम, खाटेवर सापडले LOVE COUPLE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- येथील झाबुआच्या उमरियामध्ये एका शेतात खाटेवर प्रेमीयुगुलाचे मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. मृतदेहांशेजारी विषाची बॉटल सापडली आहे. कुटुंबीयांच्या भीतीपोटी दोघांनी आत्महत्या केली असावा असा पोलिसांना संशय आहे.
हे आहे प्रकरण
- राणापूर येथील पोलिस अधिकारी आर. सी. भास्करे यांनी सांगितले, की रमा डामोर (वय 16) आणि महेश भाबोर (वय 18) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
- दोघे वगई येथील दहाव्या वर्गात शिकतात. रविवारी दोघांचे मृतदेह एका शेतात सापडले.
- दोघे एका खाटेवर लेटले होते. याची माहिती मिळाल्यावर लगेच शेतात मोठ्या संख्येने ग्रामस्थ गोळा झाले.
- दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते. पण त्यांचे गोत्र एक असल्याने मोठी अडचण होती.
- आपले लग्न होऊ शकत नाही याची दोघांना कल्पना होती. कुटुंबीय लग्नाला राजी होणार नाही, असे दोघांना वाटायचे.
- त्यामुळे दोघांनी किटकनाशके घेऊन आत्महत्या केली असावी.
मुलीची आई म्हणाली, दोघांची हत्या झाली
- रमा शनिवार रात्रीपासून बेपत्ता होती. नातलगांकडे तिला शोधण्यात येत होते.
- रमाची आई बुचीबाईने आरोप केला आहे, की माझ्या मुलीला महेशच्या कुटुंबीयांनी ठार मारले.
- दोघांनी जर आत्महत्या केली असती तर मृतदेह असे सापडले नसते. विष घेतल्यानंतर दोघांनी हालचाल केली असेल.
- असा कोणताही पुरावा सापडत नाही. दोघांना ठार मारले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, दहावीतील या प्रेमीयुगुलाचे आणखी काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...